रविवारी आंब्यांची, चिकन मटणाची दुकानं उघडणार का? खवय्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

चिकन, मटण, अंडी, आंबे, इतर भाजीपाला आणि फळं खरेदी करताना नागरिकांनी कोव्हिड संबंधी नियमांचं उल्लंघन करु नये, असं आवाहन केलं जात आहे. डबल मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका, अंतर ठेवून रांगेत उभे राहा, हातात स्वच्छ धुवा, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे.

  मुंबई :राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात शनिवार व रविवार कडक लॉकडाउन लागू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जणांनी रविवारच्या दिवशी मांसाहाराचे वेध लागले तर कसे ? चिकन मटण पोल्ट्री आणि इतर दुकानं वीकेंडला उघडी राहणार का? असा सवाल राज्यसरकारला केला आहे. इतकेच काय तर लोकांच्या मनातील प्रश्नांवर राज्य सरकारकडूनही खुलासा करण्यात आला आहे.

  प्रश्न : राज्यात चिकन मटण पोल्ट्री आणि इतर शॉप वीकेंडला उघडे राहणार का? आणि याच्याची संलग्न मालाच्या वाहतुकीवर काही बंधने आहेत का?

  उत्तर : हो. चिकन मटण पोल्ट्री आणि इतर अन्न संलग्न दुकाने आठवड्याचे सातही दिवस खुली राहणार आहेत. त्याची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर वैयक्तिक होम डिलीव्हरीला परवानगी असेल. ७ ते ११ या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यास ऑर्डर नुसार दंड भरावा लागेल. माल वाहतुकीला काहीही बंधन नाही

  प्रश्न : आंब्याची दुकाने सकाळी ११ नंतर चालू राहू शकतील का? या वेळेनंतर प्रक्रिया आणि क्रमवारी लावणे याबाबत काय?

  उत्तर : ७ ते ११ मध्ये दुकाने सुरु राहू शकतील. सकाळी ११ वाजल्यानंतर होम डिलीव्हरीला परवानगी असेल. माल वाहतुकीला कुठलेही बंधन नाही. ग्रेडिंग, पिकवणे आणि विभागीकरणाला 11 नंतर परवानगी आहे.

  कोव्हिड संबंधी नियम पाळा

  चिकन, मटण, अंडी, आंबे, इतर भाजीपाला आणि फळं खरेदी करताना नागरिकांनी कोव्हिड संबंधी नियमांचं उल्लंघन करु नये, असं आवाहन केलं जात आहे. डबल मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका, अंतर ठेवून रांगेत उभे राहा, हातात स्वच्छ धुवा, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे.