यंदाही वाजणार नाही का शाळेची घंटा? विद्यार्थी व पालक संभ्रमात

पहिली ते आठवीपर्यंत गेल्या वर्षभरात झालेल्या शैक्षणिक वर्षात सर्वांनाच पास करावे असा शासनाने आदेश काढले. कोरोना साथीमुळे धास्तावलेल्या शिक्षण विभागाने दहावी बोर्डाच्या परीक्षा ही रद्द केल्या आहेत. मागील नववी आणि दहावीच्या गुणांकानुसार पास करावे असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर शासनाने गेल्या दोन दिवसापूर्वी बारावी बोर्डाच्या ही परीक्षा न घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

    दरवर्षी सर्वसाधारपणे जून महिना सुरू झाला की विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरु होते. नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व उत्सूक असतात. मात्र मागील वर्षी कोरोनाची पहिली लाट आली आणि हे समीकरणच बदललं. शाळकरी मुलांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. मागील संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांना घरात बसून अभ्यास करावा लागला. हे कोरोना संकट लवकर टळेल असे वाटत असतानाच त्याची दुसरी लाट पुन्हा आली. सध्या ही लाट ओसरत आहे मात्र आता शासनाने तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा शाळा सुरु होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    दरवर्षी १५ ते २० जून या कालावधीत सुरू होणार्‍या शाळा यावर्षी मात्र सुरू होण्याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय नाही. गेले वर्षभर घरात राहून ऑनलाईन शिक्षण घेतलेली मुले आता कंटाळली आहेत. त्यांना आपल्या वर्गखोल्या, बेंचीस, शाळकरी मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत आपल्या शिक्षकांकडून वर्गात शिक्षण घेण्याची तीव्र उत्कंठा आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेतेे आणि शाळेची पहिली घंटा कधी वाजते याकडे शाळकरी मुले आणि पालकांचे तसेच शिक्षकांचेही लक्ष लागून राहिले आहे.

    कोरोनाच्या या महामारीमुळे सिंधुदुर्गसह राज्यात माध्यमिक आणि प्राथमिक शाळा गेल्या वर्षभरात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. पहिली ते सातवी, आठवी ते दहावी व ११ वी १२ वी नंतरचे सर्व वर्ग ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम घेण्यात आले. त्यावर सराव परीक्षा सुद्धा घेण्यात आल्या. अनेक वेळा नेटवर्क कंनेक्टिविटीच्या अडसरमुळे मुलांचा शाळेमध्ये होणारा अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष नेट कनेक्टिव्हीटीमधील अभ्यासक्रम यामुळे बरीच तफावत आहे. त्याचे आता मूल्यमापनही होत आहे.

    पहिली ते आठवीपर्यंत गेल्या वर्षभरात झालेल्या शैक्षणिक वर्षात सर्वांनाच पास करावे असा शासनाने आदेश काढले. कोरोना साथीमुळे धास्तावलेल्या शिक्षण विभागाने दहावी बोर्डाच्या परीक्षा ही रद्द केल्या आहेत. मागील नववी आणि दहावीच्या गुणांकानुसार पास करावे असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर शासनाने गेल्या दोन दिवसापूर्वी बारावी बोर्डाच्या ही परीक्षा न घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

    यंदा शैक्षणिक वर्षात जुन महिना सुरू झाला तरी शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय शासनाकडून आलेला नाही. गेल्या काही दिवसापूर्वी येत्या १४ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू होणार अशाप्रकारची चर्चा सुरू होती. परंतु यावर अद्यापही शासनाकडून कोणताच निर्णय न आल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी स्पष्ट केले आहे. तरी देखील येत्या १४ जूनपासून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतल्यास शाळा ऑनलाईन की ऑफलाईन पद्धतीने सुरू होईल हे अजूनही प्रश्नांकित आहे. शाळा कशीही सुरू झाली तरी त्यासाठी शिक्षक तयार असून शासनाने शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय घ्यावा अशी मागणी पालक व शालेय व्यवस्थापन समित्यांमधून केली जात आहे.