sanjay raut

आज देशभरात सुरु असेलेला भारत बंदला (Bharat Bandh) जगभरातून पाठिंबा मिळतो आहे. कारण हा बंद राजकीय नसून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आहे. या बंदमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. कोणत्याही पक्षाचा वेगळा झेंडा या बंदमध्ये नाही. त्यामुळे केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी आणि महाराष्ट्रातील विरोधकांनी याचा विचार करावा, असे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आपले हक्क आणि स्वातंत्र्य देण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून थांबले आहेत. त्यांच्या भावना आणि हक्क याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे या बंदला आपण पाठिंबा द्यायला हवा. हा बंद कोणत्याही प्रकारे हातात हंटर (डंडा) घेऊन करण्यात आला नाही. त्यासाठी कोणाच्याही हातात हंटर नाही. खरेतर हंटर केंद्र सरकारच्या हातात आहे. त्यामुळे जे लोक या कायद्याचे समर्थन करत आहेत त्यांनी एकदा स्वत:ची भूमिका पुन्हा एकदा तपासून पाहिली पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.