मद्यधुंद अवस्थेत तरूणानी केलं असं काही…पाहून व्हाल थक्क?

सांगली - सांगलीमध्ये भर दिवसा एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरूणाने चारचाकी गाड्या फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना काल शनिवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमधील

सांगली – सांगलीमध्ये भर दिवसा एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरूणाने चारचाकी गाड्या फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना काल शनिवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमधील महाराजा चौक परिसरात या तरूणाने दहा चारचाकी गाड्या फावड्याच्या सहाय्याने फोडल्या आहेत. तसेच पाच ते सहा गाड्यांची तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येथील परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, हा तरूण २७ वर्षीय आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या काच्या फोडण्यास त्याने अचानक सुरूवात केली. तसेच कॉलेज कॉर्नरपासून आमराई ते महाराजा चौक या परिसरातील त्याने गाडीच्या काचा फोडल्या. परंतु येथील परिसरातील नागरिकांनी साहस करून या मद्यधुंद असलेल्या तरूणाला फावड्यासह पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच या गंभीर प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.