पर्यटन क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद करण्याची युवक काँग्रेसची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

मुंबई: लॉकडाऊनमुळे पर्यटन उद्योग अनिश्चित काळासाठी आर्थिक कोंडीत सापडला असल्याने पर्यटन क्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष

 मुंबई: लॉकडाऊनमुळे पर्यटन उद्योग अनिश्चित काळासाठी आर्थिक कोंडीत सापडला असल्याने पर्यटन क्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे मार्च, एप्रिल, मे महिने म्हणजे पर्यटन व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचा सीझन असतो. लॉकडाऊनमुळे हाच सीझन वाया गेला आहे. तसेच भविष्यातील अनिश्चिततेने या पर्यटन उद्योगाला ग्रासले आहे. या उद्योगाशी निगडीत हजारो लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. सत्यजीत तांबे यांनी या संदर्भात काळजी व्यक्त करतानाच पर्यटनस्थळांवरील सुशोभीकरण वा विकासकामांसाठी वार्षिक निधी खर्च करू नये, अशी सूचना देखील केली आहे. त्यापेक्षा हा वार्षिक निधी पॅकेज म्हणून पर्यटन क्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी जाहीर करावा, अशी मागणी तांबे यांनी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.