कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी युवक काँग्रेसचा ”डिजिटल छत्रपती युथ फेस्टिव्हल”

लॉकडाऊनच्या काळात युवकांना घरीच थांबवण्यासाठी आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक वळण देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी छत्रपती युथ फेस्टिव्हल 'च्या

लॉकडाऊनच्या  काळात  युवकांना घरीच थांबवण्यासाठी आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक वळण देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी छत्रपती युथ फेस्टिव्हल ‘च्या अंतर्गत डिजिटल कार्यक्रमाची घोषणा केली आहे.हा फेस्टीवल आनंदोत्सव नसून युवकांना व्यक्त होण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि वेळेचा सदुपयोग काहीतरी नवीन शिकण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून युवकांनी याकडे पहावे, असे आवाहन तांबे यांनी केले आहे

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. .आधीच मंदावलेली अर्थव्यवस्था कोरोनामुळे पुर्णपणे ठप्प झाली आहे. नोकरदारांना त्यांच्या रोजगाराची चिंता आहे.लघु , मध्यम व्यवसायिक देखील चिंतीत आहेत.सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्याचा मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होत चालला आहे.कौटुंबिक वाद वाढत असून घरघुती हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. दुसरीकडे तरुण बाहेर पडायच्या घटना अजूनही घडतच आहेत.गायन-नृत्य,चित्रकला, निबंध,स्टँड अप कॉमेडी अशा अनेक मनोरंजनात्मक स्पर्धा घरच्याघरी ऑनलाईन उपलब्ध झाल्यास तरुण घराबाहेर पडणार नाहीत आणि लॉकडाऊनचे पालन होईल  आणि मिळालेल्या वेळेचा उपयोग नवीन गोष्टी शिकण्यासाठी होईल या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे तांबे यांनी सांगितले.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांचे मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत असल्याने या कार्यक्रमाद्वारे लोकांना कोरोनाच्या काळात आणि नंतर उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा याचे  मार्गदर्शन विविध क्षेत्रातील मान्यवर  ऑनलाईन परिसंवादाद्वारे करणार आहेत.यामध्ये आरोग्य, मानसशास्त्र, अर्थशास्त्र,बांधकाम ,संगीत,पर्यावरण इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असणार आहे 

कोरोनामुळे आलेले चिंतेचे मळभ दूर सारून आर्थिक आणि व्यावसायिक पातळीवर समतोल साधत मानसिक संतुलन ठेवण्यास आणि आणि लॉकडाऊनचे पालन करण्यास छत्रपती युथ फेस्टिव्हल च्या अंतर्गत हा कोरोना विशेष कार्यक्रम पूरक ठरेल, असे तांबे यांनी सांगितले.