
अलिबाग : सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे व सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी किहीम ग्रा.प.सदस्य प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड मागील काही दिवसांपासून पक्षनेतृत्व डावलत असल्याने ते नाराज व अस्वस्थ असल्याचे तसेच ऐन किहीम ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत ते कदाचित ‘वेगळा’ निर्णय घेण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा चोंढी पंचक्रोशीत दबक्या आवाजात सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोरगरिबांचे कैवारी व काँग्रेस पक्षाचे अलिबाग-उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. मधूशेठ ठाकुर यांच्या तालमीत वाढलेले व त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सामाजिक कार्यात नेहमीच सिहांचा वाटा घेत सहभाग घेणारे, कोरोना काळात झोकून देत लोकांची सेवा करणारे, नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारे, नागरिकांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य व शैक्षणिक आदी प्रत्येक सामाजिक कार्यात व प्रत्येकवेळी स्वतःचा खिसा रिकामा करून सामाजिक बांधिलकी जपणारे सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रा.प.सदस्य प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड हे मागील काही दिवसांपासून पक्ष नेतृत्व डावलत असल्याने व लोकांची कामे होण्यासाठी ‘वरिष्ठ’ नेतेमंडळी लक्ष देत नसल्याने ते काहीसे नाराज व अस्वस्थ दिसत आहेत. यामुळे कदाचित ते ‘वेगळा’ निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे, अशी चर्चा चोंढी पंचक्रोशीत दबक्या आवाजात सुरू आहे. पिंट्या गायकवाड यांचा पंचक्रोशीत दांडगा जनसंपर्क असल्याने व तरुणाईसह व नागरिकांचा पाठिंबा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असल्याचे वारंवार दिसून येत आहे, त्यामुळे ते एक उत्तम सरपंच पदाच्या तोडीचा उमेदवार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे व त्याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जात आहे. तसेच पिंट्या गायकवाड यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत असलेली घनिष्ठ मैत्री व सलोख्याचे संबंध यामुळे ते कोणता ‘वेगळा’ निर्णय घेतात, याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
याबाबत अधिक माहितीसाठी पिंट्या गायकवाड यांना संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी “वेट अँड वॉच” याव्यतिरिक्त काहीही बोलण्यास नकार दिला आहे.