
सुशांत मेश्राम यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी फौजदारी पात्र कट रचून विदर्भ कॉटन नावाची कंपनी उघडून कापूस रुई गाठीचा व्यापार सुरु केला. त्यानंतर, सुरेश अनासानेने महाराष्ट्र मुल्यावर्धित कायदा व केंद्रीय विक्रीकर कायद्यातंर्गत वॅटची नोंद केली.
अमरावती : कापूस गाठीच्या व्यापाऱ्याने १ कोटी ४२ लाख ४७ हजार ५८३ रुपयांचा वॅट न भरता शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ११ मे रोजी अमरावती शहरात उघडकीस आला आहे. राज्यकर निरीक्षक सुशांत डिंगाबर मेश्राम (३६, रा. चैतन्य कॉलनी) यांनी या घटनेची तक्रार ११ मे रोजी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सुरेश शंकरराव अनासाने ( ७१, रा. ह. मु. विलास कारंजकर यांच्या घरी भाड्याने, निळकंठ चौक, अमरावती), संजय प्रयाल (४८, रा. शनि मंदिर सक्करसाथ, अमरावती) व गोपाल मुकुंद निर्मळ (रा. जुना सराफा, अमरावती) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
सुशांत मेश्राम यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी फौजदारी पात्र कट रचून विदर्भ कॉटन नावाची कंपनी उघडून कापूस रुई गाठीचा व्यापार सुरु केला. त्यानंतर, सुरेश अनासानेने महाराष्ट्र मुल्यावर्धित कायदा व केंद्रीय विक्रीकर कायद्यातंर्गत वॅटची नोंद केली. त्यानंतर १ कोटी ४२ लाख ४७ हजार ५८३ रुपयांचा वॅट न भरता शासनाची फसवणूक केली, असा आरोप तक्रारीतून केला आहे.