
देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात राहणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लोकांचे पक्के घर नाहीत. या करीता घरकुल देण्याची मागणी होती. या मागणीला धरून आमदार सहसराम कोरोटे यांनी शासनस्तरावर अनेकवेळा पाठपुरावा केले. अखेर महाविकास आघाडी सरकारला निधी मंजूर करणे भाग पडले.
देवरी : देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लोकांकरिता पक्के घर नाही. या करिता आमदार सहेषराम कोरोटे यांनी सतत पाठपुरावा करुन शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकामाकरिता प्रत्येक लाभार्थी १ लक्ष २० हजार रुपये प्रमाणे एकूण १६४ लाभर्थ्यांकरिता १ कोटी ९६ लक्ष ८० हजारांची निधी मंजूर करून घेण्यास यश मिळविले.
देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात राहणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लोकांचे पक्के घर नाहीत. या करीता घरकुल देण्याची मागणी होती. या मागणीला धरून आमदार सहसराम कोरोटे यांनी शासनस्तरावर अनेकवेळा पाठपुरावा केले. अखेर महाविकास आघाडी सरकारला निधी मंजूर करण्यास भाग पाडले.
यात शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या देवरी तालुक्यात १०० लोकांना तर आमगांव तालुक्यात १५ आणि सालेकसा तालुक्यातील ४९ लोकांना असे एकूण १६४ लोकांची निवड करण्यात आली. प्रत्येक लाभार्थ्याला १ लक्ष २० हजार रुपये प्रमाणे १ कोटी ९६ लक्ष ८० हजार रूपयांची निधी वैयक्तिक घरकुल बांधकामासाठी मंजूर करण्यात आली. हा निधी मंजूर करण्यास आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. त्यामुळे विधानसभा क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लोकांनी आमदार कोरोटे यांचे आभार मानले.