6 crore 65 lakh fraud on the pretext of investment in Pimpri; A case has been registered against four

  पुणे : शिक्षणानिमित्त आलेल्या तरुणाशी ओळख वाढवत त्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत २५ वर्षीय तरुणाची तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पूर्ण कुटूंबानेच त्याची फसवणूक केली असून, पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

  चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार

  याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुशील श्रीकांत तोडणकर, सिद्धार्थ श्रीकांत तोडणकर व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२० ते २०२३ या कालावधीत घडला आहे.

  शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा नफ्याचे आमिष

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण पुण्यात शिक्षणानिमित्त आला होता. तो बालेवाडी परिसरात राहत होता. तो मुळचा नगर जिल्ह्यातील असून, शेतकरी आहे. त्याची बागायती शेती आहे. दरम्यान, एका मित्राने त्याची व तोडणकर यांची ओळख करून दिली होती. तेव्हा तोडणकर यांनी त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा नफा मिळेल असे सांगितले.

  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केला गुन्हा दाखल

  त्याला गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा मिळेल असे आमिष त्यांनी दिले. त्यानंतर वेळोवेळी त्याच्याकडून त्यांनी तब्बल १ कोटी ८० लाख रुपये घेतले. परंतु, ते पैसे परत केले नाहीत. त्याला चेक दिले असता ते चेक बाऊन्स झाले. यानंतर तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी या अर्जाची चौकशी केली. त्यानंतर गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.