ज्वेलर्समधून १ लाख ४८ हजाराचे दागिने लंपास, सोने खरेदी करण्यासाठी आले अन्…

कवठेमहांकाळ येथील शिवप्रसाद ज्वेलर्समधून अज्ञात चोरट्याने १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे २०० नग मनी पळवले. हा प्रकार सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडला. कवठे महांकाळ पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील शिवप्रसाद ज्वेलर्समधून अज्ञात चोरट्याने १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे २०० नग मनी पळवले. हा प्रकार सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडला. कवठे महांकाळ पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चोरट्यानी खरेदीच्या बहाण्याने येऊन दिवसा लूट केल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. प्रसन्न रमेश सगरे (वय ४०, आयसीआयसी बँकेजवळ, कोरे गल्ली, कवठेमहांकाळ) यांनी याची फिर्याद पोलिसांत दिली.

    अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचच्या दरम्यान पाच अनोळखी महिला व एक पुरुष असे सोने खरेदीच्या बहाण्याने शिवप्रसाद ज्वेलर्समध्ये आले. दरम्यान, सायंकाळी महिला व पुरुषांनी काचेच्या काउंटरवरून हात घालून सोन्याची १ लाख ४८ हजार रुपयांचे मनी चोरट्याने पळवले. भर दिवसा चोरीची घटना घडली. अज्ञात चोरटे सराफी दुकानात फिरून आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत टिपले गेले आहे. कवठेमहांकाळ पोलिसात नोंद झाली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.