10 - 12 persons attempted armed attack on woman, vandalized two vehicles

रात्री १० वाजण्याच्या सुमारास पीडित महिला सासू आणि मुलासोबत घरात झोपली होती. दुपारी दोन वाजता ती शौचालयात गेली असता तिला घराबाहेर मोठा आवाज आला. परिसरामधील रहिवासी रवी गाडगे आणि इतर १० - १५ जण हातात शस्त्रे, काठ्या घेऊन महिलेला हाक मारत होते. भीतीमुळे महिला शौचालयाच्या बाहेर पडली नाही. त्यामुळे आरोपींनी महिलेच्या दोन वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.

    वर्धा : १० – १२ जणांनी मिळून महिलेवर सशस्त्र हल्ला (Armed assault on woman) करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहनांची तोडफोड केल्याची घटना आर्वी पोलीस ठाण्यांतर्गत (Arvi Police Station) असलेल्या संजय नगर येथे घडली. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून रवी गाडगे यांच्यासह १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १० वाजण्याच्या सुमारास पीडित महिला सासू आणि मुलासोबत घरात झोपली होती. दुपारी दोन वाजता ती शौचालयात गेली असता तिला घराबाहेर मोठा आवाज आला. परिसरामधील रहिवासी रवी गाडगे (Ravi Gadge) आणि इतर १० – १५ जण हातात शस्त्रे, काठ्या घेऊन महिलेला हाक मारत होते. भीतीमुळे महिला शौचालयाच्या बाहेर पडली नाही. त्यामुळे आरोपींनी महिलेच्या दोन वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.