file photo
file photo

दुर्गादेवी विसर्जन विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गावरून जात असताना जनरेटरच्या पेट्रोल पाइपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला.

    सातारा : राज्यभरात काल नवरात्री उत्सवाची (Navaratri 2023) सांगता झाली. ठिकठिकाणी सार्वजनिक दुर्गादेवींचा विसर्जन करण्यात आलं. महाबळेश्वर येथील दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. कोळी आळी परिसरात रविवारी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत जनरेटरच्या इंधनाच्या पाईप ढिला झाल्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात दहा लहान मुले भाजल्याने गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर सातारा येथे नंतर काही मुलांची प्रकृती गंभीर झल्याने त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

    नेमकं काय घडलं?

    साताऱ्याच्या वाई येथील कोळी आळी परिसरात रविवारी दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली होती. दुर्गादेवीच्या विर्सजन मिरवणुकीसाठी मंडकाकडून जनरेटर लावण्यात आले होते. विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गावरून जात असताना अचानत जनरेटरच्या पेट्रोल पाइपला गळती लागली आणि जनरेटरचा ब्लास्ट होऊन आग लागील.  या आगीत दुर्गादेवीच्या मूर्तीजवळ बसलेली काही दहा मुले भाजली. या घटनेनंतर तात्काळ सर्वा जखमी मुलांना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला हलवण्यात आले आहे. सद्या या मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेत जखमी झालेली सर्व मुलं ही 7 ते 10 या वयोगटातील आहे.