नंदुरबारच्या चरणमाळ घाटात बस पलटी होऊन अपघात, 10 प्रवासी गंभीर जखमी

बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते, यापैकी 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. मात्र, या परिसरात पाऊस सुरु असल्यामुळेमदतकार्यात अडचणी येत आहेत.

    नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ घाटात खासगी लक्झरी बसचा अपघात झाल्याची (Bus Accident) माहिती समोर आली आहे. या अपघातात आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. उतारावर बस चालवत असताना चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती बस पलटी होऊन घाटाच्या पायथ्याशी कोसळून हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढून जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते, यापैकी 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. मात्र, या परिसरात पाऊस सुरु असल्यामुळेमदतकार्यात अडचणी येत आहेत.