थेट बांधावर मिळतोय एकरी १०० टन; ऊस उत्पादनाचा कानमंत्र

शाश्वत ऊस शेती मृदा संवर्धनसह शाश्वत एकरी १०० टन ऊस उत्पादनाचा कानमंत्र बारामतीच्या शेतकऱ्यांना (Baramati Farmers) तज्ज्ञांच्या माध्यमातून थेट बांधावर मिळाला आहे. यासाठी बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मेहनत घेत आहेत.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शाश्वत ऊस शेती मृदा संवर्धनसह शाश्वत एकरी १०० टन ऊस उत्पादनाचा कानमंत्र बारामतीच्या शेतकऱ्यांना (Baramati Farmers) तज्ज्ञांच्या माध्यमातून थेट बांधावर मिळाला आहे. यासाठी बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मेहनत घेत आहेत.

    बारामती तालुक्यातील सोमेश्वर, वानेवाडी, लाटे, वडगाव,खांडज, भवानीनगर, डोर्लेवाडी या ठिकाणी आडसाली लागवडीचे तंत्रज्ञानासाठी व मृदा संवर्धन करिता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील माजी शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये ऊस पिकासाठीचे लागवड तंत्रज्ञान व एकरी १०० टन ऊस उत्पादनाचा कानमंत्र गावातील शेतकऱ्यांना बांधावर जाऊन देण्यात आला.

    उसाच्या शाश्वत उत्पादन पुस्तिकेचे वाटप

    या माध्यमातून ऊस पिकाचे शाश्वत उत्पादनाची पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी ऊस पिकाचे करावयाच्या कामाची माहिती, ऊस पिकाच्या नोंदी ठेवण्यास आणि ऊस पिकाचे नियोजन करण्यास याची मदत होईल. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना बेणे निवड, पूर्वमशागत, लागल, बेसल डोस, अंतर मशागत, आंतरपीक, उसावरील फवारण्या, ड्रीपमधील खते, तणांचे नियंत्रण, अशा विविध बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.