मढ मार्वे स्टुडिओत १००० कोटींचा घोटाळा, अस्लम शेख यांच्यावर किरीट सोमय्यांचा आरोप

मढ मार्वेमध्ये १००० कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळाप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर हे गंभीर आरोप केले असून मुंबई जिल्हाधिकारी आणि पालिकेला कठोर कारवाई करण्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे.

    मुंबई – माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. मढ मार्वेमध्ये १००० कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळाप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर हे गंभीर आरोप केले असून मुंबई जिल्हाधिकारी आणि पालिकेला कठोर कारवाई करण्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. मला स्टुडिओ तोडण्याची अपेक्षा असल्याचे देखील सोमय्या यांनी यावेळी ट्विट करत म्हटले आहे.

    पर्यारण मंत्रालयाने नोटीस बजावल्यानंतर माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोमय्या यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, मढ मार्वेमध्ये समुद्र किनाऱ्यावर अस्लम शेख यांनी अनधिकृत स्टुडिओ बांधकाम केले असून त्यांची त्यात मोठा घोटाळा केला आहे. राज्याच्या पर्यारण विभागाने त्यांना एक नोटीस बजावली असून, मुंबई पालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी असे आदेश दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.