
जिल्ह्यातील अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून गावागावात अवैध सावकाराच्या ठेवी आहेत. गरजू असलेल्या शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना पैसे देवून मोठ्या प्रमाणात व्याज आकारले असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चांगली पंचाईत होते.
वर्धा : सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, काही थकीत शेतक-यांना बँकेकडून पीककर्ज मिळत नसल्यामुळे नाइलाजाने सावकराच्या उंबारठ्यात उभे राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याच अडचणी फायदा घेत सावकार भरमसाठ व्याज आकारून पैसे दिले जात आहेत. जिल्ह्यात १५० परवानाधारक सावकारांकडून दोन महिन्यात तब्बल १० हजार ७४६ कर्जदारांना ११५ कोटी ५ लाख १५ हजारांचे कर्ज दिले असून, त्यात शेती कर्जाची मात्र नोंद नाही, हे विशेष.
खरीप हंगामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी बी- बियाणांची जुळवाजुळव करून पेरणीसाठी सज्ज झाले आहे. मात्र, थकीत शेतक-यांना बँकेकडून कर्ज मिळत नसल्यामुळे सावक-यांच्या दरात जावून पैशांची जुळवाजुवळ करावी लागत आहे. शेतकरी कर्जमुक्त व्हावे, यासाठी शासन स्तरावरून विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र, त्या योजनाचा लाभ प्रत्येक शेतक-यांना मिळत नाही. जिल्ह्यात १५० परवानाधारक सावकारांची नोंद आहे. दरवर्षी या सावकाराकडून फक्त बिगरशेती कर्ज दिले जाते. मात्र, शेतीविषयक कर्ज दिले जात नाही.
कर्जवाटपात देवळी तालुका आघाडीवर असून एकट्या देवळी तालुक्यात ५ हजार १४३ जणांनी ६ कोटी ३९ लाख ८६ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर दुस-या क्रमांकावर हिंगणघाट तालुकातून १ हजार ४०९ जणांनी १ कोटी ६० लाख ५१ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर येत आहे. हा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सावकारांकडून कर्ज घेताना कृषीविषयक कर्ज, बिगरशेती कर्ज (व्यापारी कर्ज) देण्यात येत असते. मात्र, नोंदणीकृत सावकारांकडून जिल्ह्यात एकाही शेतक-याला शेतीसाठी कर्ज देण्यात आल्याची नोंद नाही.
जिल्ह्यातील अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून गावागावात अवैध सावकारांच्या मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. गरजू शेतक-यांना, सर्वसामान्यांना रक्कम देवून व्याज घेत असते. प्रत्येकाला पैशाची गरज असते. परंतु, ऐनवेळी ती पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, अवैध सावकार पूर्ण करतात आणि तेवढ्याच जबरीने ते वसुली सुद्धा करीत असतात. अवैध सावकारीचा हा फास अनेकांना विळख्यात घेत आहे.
जिल्ह्यात शेतीविषयक कर्ज नाही
जिल्ह्यात १५० परवानधारक सावकरांनी या दोन महिन्यात १० हजार ७४६ कर्जदारांना ११५ कोटी ५ लाख १५ हजारांचे कर्ज दिले आहे. मात्र, त्यात कुठलेही शेतीविषयक कर्जाची नोंद नाही. त्यामुळे परवानधारक सावकार फक्त बिगरशेती कर्ज देत असल्याची नोंदी आहे. त्यामुळे, गरजू शेतक-यांना, सर्वसामान्यांना रक्कम देवून व्याज घेत असते.
भितीपोटी तक्रार करण्यास नकार
जिल्ह्यातील अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून गावागावात अवैध सावकाराच्या ठेवी आहेत. गरजू असलेल्या शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना पैसे देवून मोठ्या प्रमाणात व्याज आकारले असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चांगली पंचाईत होते. मात्र, शेतकरी किंवा कोणातीही व्यक्ती भितीपोटी तक्रार करण्यास नकार देत असल्यामुळे जिल्ह्यात अवैध सावकरी करणा-यांची संख्या वाढतच आहेत.