१३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी १०८ तर सदस्य पदासाठी ५९८ नामनिर्देशन पत्र दाखल

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ च्या कार्यक्रमांतर्गत सरपंच आणि सदस्य या पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी १०८ तर सदस्य पदासाठी ५९८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

    बारामती : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ च्या कार्यक्रमांतर्गत सरपंच आणि सदस्य या पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. बारामती तालुक्यात आज अखेर सरपंच पदाच्या जागांसाठी मोरगाव येथील ६, काऱ्हाटी ४, लोणीभापकर ५, मासाळवाडी ५, पळशी ५, पणदरे ११, कुरणेवाडी ११, वाघळवाडी १३, मुरुम १४, वाणेवाडी ७, गडदरवाडी ५, सोरटेवाडी ५, व सोनकसवाडीचे १७ असे एकूण १०८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

    सदस्य पदासाठी मोरगाव येथील ३९, काऱ्हाटी ३४, लोणीभापकर ३८, मासाळवाडी २२, पळशी २६, पणदरे १०४, कुरणेवाडी ३४, वाघळवाडी ६१, मुरुम ७५, वाणेवाडी ४६, गडदरवाडी २२, सोरटेवाडी २१, व सोनकसवाडीचे ७६ असे एकूण ५८८ नामनिर्देशन पत्र
    दाखल झाले आहेत, अशी माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.