10th Pune Club Premier Cricket League 2024 starts from February 12, a glorious decade of PCPL

  पुणे : पुना क्लब लिमिटेडच्या वतीने दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.12 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुना क्लब क्रिकेट मैदानावर होणार आहे. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पुना क्लबचे अध्यक्ष श्री सुनिल हांडा यांनी सांगितले की, स्पर्धेतील खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करण्यात आली असून, संघांचे मालक हे क्लबचे सदस्य आहेत.
  या वर्षी 12 संघांनी नोंदवला सहभाग
  पुना क्लबचे उपाध्यक्ष आणि पीसीपीएलचे अध्यक्ष गौरव गढोके यांनी सांगितले की, या वर्षी पीसीपीएल स्पर्धेचे गौरवशाली दशक असून, यंदाच्या वर्षी 12 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच, विशेषतः पीसीपीएल स्पर्धेचे गौरवशाली दशकाच्या औचित्याने 16 वर्षाखालील खेळाडूंचादेखील या संघात समावेश असणार आहे. याशिवाय
  पुना क्लब लिमिटेडच्या वतीने वार्षिक शिष्यवृत्ती प्रदान
  सर्व गटातील 25 उदयोन्मुख खेळाडूंना पुना क्लब लिमिटेडच्या वतीने वार्षिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पुना क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला  जेट सिंथेसिस यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. देसाई ब्रदर्स लिमिटेड, एलिका, रुबी हॉल क्लीनिक, हिलयॉस, सुराणा ट्रेडर्स यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहेत.  लिलावात रौनक ढोले पाटील, आरव वीज आणि किरण देशमुख हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.
  हे 12 संघ स्पर्धेत सहभागी
  स्पर्धेत जेट्स(राकेश नवनी), जीएम टायफून्स(आश्विन शहा व क्रिश शहा), क्वालिटी वॉरियर्स(आरव विज), मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स(मनप्रीत उप्पल व गौरव गढोके), ओबेरॉय अँड निल किंग्ज(वीरेंदर सिंग ओबेरॉय व इंद्रनील मुजगुले), व्हीके टायगर्स(विक्रम काकडे),  फोर ओक्स सेलर्स(सुमीरन मेहता), कपिला परमार ऑल स्टार्स(हिरेन परमार व कपिल ढोले पाटील), पृथ्वी लायन्स(अमर सेंभे), व्हीएनएन वुल्व्हस(रिद्दी शेवानी), तलब टायटन्स(अली तलब) आणि हिलयॉस इगल्स(सलील भार्गव व आदित्य भारतीया) हे 12 संघ सहभागी झुंजणार आहेत.
  एका सामन्यासाठी प्रत्येकी 9 खेळाडूंचा समावेश
  ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत प्रत्येक संघात एका सामन्यासाठी प्रत्येकी 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.00 ते रात्री 10.00 या वेळेत होणार असून काही सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहेत.
  विजेत्या संघाला करंडक देण्यात येणार
  स्पर्धेतील 12 संघांची  2 गटात प्रत्येकी 6संघ अशी विभागणी करण्यात आली आहे.  तसेच, या दोन्ही गटांतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असून यातील अव्वल संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना दि. 17 फेब्रुवारी 2024 या दिवशी होणार आहे. विजेत्या संघाला करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेहि दिली जाणार आहेत.
  स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन
  याशिवाय महिला व क्लबच्या सदस्यांच्या लहान वयोगटासाठीदेखील अंतिम फेरीच्या दिवशी स्पर्धा घेण्यात येणार आहे. याबरोबरच सर्व खेळाडूंना व उपस्थितांना खेळाबरोबरच खाद्यपदार्थ, मनोरंजन याची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये गौरव गढोके(स्पर्धा अध्यक्ष), तुषार आसवानी, अमित रामनानी, ऋषी चैनानी व रणजित पांडे(स्पर्धा संचालक)यांचा समावेश आहे. कारा इन्टलेकट याच्या संकल्पनेतून व व्यवस्थापनेतुन ही स्पर्धा पार पडणार आहे.