माढा तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.८९ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board Exam) वतीने फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, माढा तालुक्यात एकूण ४ हजार ८१५ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ७४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

    कुर्डुवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board Exam) वतीने फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, माढा तालुक्यात एकूण ४ हजार ८१५ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ७४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४ हजार ६४० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल ९७.८९ टक्के लागला आहे. तालुक्यामध्ये एकूण ६० शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.

    यामध्ये एस. आर. मोरे स्कूल अँड काॅलेज अकोले खु., ट्विंकल स्टार टेंभुर्णी, संजीवन विद्यालय मोडनिंब, जिव्हाळा विद्यामंदिर, सनराइज इंग्लिश मीडियम, नूतन इंग्लिश मीडियम कुर्डुवाडी, शांतीविनायक माध्यमिक विद्यालय उपळाई बु, मंगल इंग्लिश मीडियम स्कूल कुर्डुवाडी, महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल बेंबळे, पालवण माध्यमिक विद्यालय पालवण, संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डुवाडी, संजयमामा शिंदे विद्यालय, भोगेवाडी, श्री नागनाथ विद्यालय कुर्डू, कर्मवीर लोकरे गुरुजी माध्यमिक विद्यालय, उजनी यांसह अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.