१२ ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदासाठी ३८ तर ४० ग्रामपंचायत सदस्य जागांसाठी २९६ उमेदवार रिंगणात 

शेवगाव तालुक्यात पार पडणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणूकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज   सरपंच पदासाठी ३८ तर ४०  प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांच्या १०८ जागांसाठी २९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य आजमावणार  आहेत. 

  शेवगाव  : शेवगाव तालुक्यात पार पडणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणूकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज   सरपंच पदासाठी ३८ तर ४०  प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांच्या १०८ जागांसाठी २९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य आजमावणार  आहेत.
  तालुक्यात पार पडणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा बुधवार शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते, यावेळी सरपंच पदाची निवड  थेट जनतेतून होत असल्याने या  निवडणुका मोठया चूरशीच्या होणार आहेत . हे आता स्पष्ट झाले आहे .तालुक्यात अमरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वाधिक ७ तर तालुक्यातील खामगाव, जोहरापूर, सुलतानपूर, वाघोली व रावतळे कुरुड्गाव अशा एकूण ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज राहिल्याने येथे दुरंगी लढती होणार आहेत. तर दहीगाव ने भायगाव, खानापूर, ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी तीन उमेदवारी अर्ज असल्याने येथे तिरंगी लढती , या शिवाय आखेगाव येथे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी  चौरंगी लढत रंगणार आहे.
  ग्रामपंचायत सदस्यासाठी जोहरापूर येथे १७ उमेदवार निवडणुकीच्या मैदनात आहेत. तालुक्यातील दहीगाव ने ग्रामपंचायतीची बहूधा बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा यावेळी खंडित झाली असली तरी येथील ग्राम पंचायत सदस्याच्या १५  पैकी ७ जागा बीनविरोध झाल्या आहेत. त्यात शांताबाई जगन्नाथ मोरे, रुख्मिणी संजय लिंबोरे, मीरा बबन पवार, दिलदार जमादार शेख, राणी विकास गजभिव, सुरेश विश्वनाथ घाणमोडे, संदीप बहिरनाथ गुंजाळ,या ७ जणांचा समावेश आहे. या  सातही जागा घुले गटाने बिनविरोध पटकावून ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम असल्याचे आपले वर्चस्व कायम असल्याचे  स्पष्ट केले आहे .
  सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधून सारिका रामदास वाघमारे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्या देखील बिनविरोध विजयी झाल्याचे नंतर जाहीर होणार आहे.
  सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ग्रामपंचायतनिहाय उमेदवार- 
  खामगाव – (२) विद्या अरुण बडधे, उषा सुभाष बडधे,
  जोहरापूर _ (२) स्नेहल रोहन लांडे, जयश्री शिवाजी खेडकर .
  सुलतानपूर – (२) सविता विजय फलके, संध्या सुरेश काते.
  वाघोली –( २ )सुश्मिता उमेश भालसिंग व निर्मला प्रकाश वांढेकर
  रावतळे = ( २ )छाया पांडुरंगा  आवटी व चंद्रकला कल्याण कवडे.
  दहीगाव ने – (३) विमल अंबादास सातपुते, सुनिता देवदान कांबळे, शिला तुळशीराम खंडागळे.
   प्रभूवाडगाव – (३) ज्ञानदेव निवृत्ती घोडेराव, संजय जगन्नाथ शिंदे