Megablock

मध्य रेल्वे मुंबई विभाग ठाणे- वाशी अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गांवर ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान भुयारी मार्गासाठी आरएच गर्डर्स आणि बॉक्स टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक परिचालित करणार आहे.

    मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) रविवारी दिवा स्थानकामध्ये विविध तांत्रिक कामं करण्यासाठी १२ तासांचा मेगा ब्लॉक (MegaBlock) जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वे या रविवारी ठाणे (Thane) ते कल्याण (Kalyan) स्थानकादरम्यान अप आणि डाऊन फास्ट अशा दोन्ही मार्गिकांवर सकाळी  ते रात्री ९ असा १२ तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. तर, रविवार हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.

    मध्य रेल्वे मुंबई विभाग ठाणे- वाशी अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गांवर ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान भुयारी मार्गासाठी आरएच गर्डर्स आणि बॉक्स टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक परिचालित करणार आहे. शनिवारी रात्री ११.३२ ते रात्री ११.४५ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी ००.०५ ते ०५.५३ पर्यंत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन  सेवा रद्द राहतील. तर, पनवेल/नेरुळ/वाशी येथून शनिवारी रोजी रात्री ११.०९ ते रविवारी सकाळी ०५.२९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप सेवा रद्द राहतील.

    रविवार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

    मध्य रेल्वे, मुंबई विभाग खालील तपशीलानुसार दिवा स्थानकावर स्विच पॉइंट, क्रॉस ओव्हर पॉइंट टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक परिचालित करणार आहे. ठाणे – कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० पर्यंत राहणार. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ७.५५ ते सायंकाळी ७.५० या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद उपनगरीय ट्रेन मुलुंड/ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.  त्यांच्या वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

    पश्चिम मार्ग

    बोरिवली – अंधेरी डाऊन फास्ट लाईन्स (२३.४५ तास – ४.४५ तास)

    बोरिवली – अंधेरी यूपी फास्ट लाईन्स (२३.४५ तास – ०३.४५ तास)

    ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, डाउन फास्ट मार्गांवर 23.45 ते 04.45 तासांपर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेतला जाईल आणि मध्यंतरी रात्री 23.45 ते 03.45 तासांपर्यंत यूपी फास्ट मार्गांवर चार तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. 26/27 मार्च 2022 रोजी बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान. त्यामुळे रविवार, 27 मार्च 2022 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक नसेल. या ब्लॉक कालावधीत, सर्व जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील.