12 lakh 72 thousand 329 candidates have been waiting for recruitment for four years, 25 crore applications have been deposited in the government coffers.

ग्रामविकास विभागाने  जिल्हापरिषद पदभरती बाबत मार्च २०१९ रोजी जाहिरात काढून विविध पदांचे अर्ज भरून घेतले. सुशिक्षित बेरोजगार, ज्यांना शासकीय नोकरीची गरज आहे. अश्या गरीब गरजू युवकांनी जिल्हा परिषद पदभरतीसाठी अर्ज केले. त्यांची संख्या १२ लाख ७२ हजार ३१९ अशी आहेत. त्या अर्जापोटी २५ कोटी ८७ लाख रु शासनाला मिळाले. मात्र आज चार वर्ष लोटूनही नोकर भरती घेतली नाही.

  यवतमाळ : मार्च २०१९ च्या सुरुवातीला शासनाने जिल्हा परिषदेची पदभरती प्रक्रिया राबविली. याकरीता लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांनी अर्ज केले. परंतु, कोरोना महामारी संकट व राज्यातील राजकीय गोंधळामुळे ही पदभरती प्रक्रिया मागील तीन वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे, राज्यातील १२ लाख ७२ हजार ३२९ परीक्षार्थी या पदभरतीची प्रतीक्षा करीत आहेत. सरकारने या परीक्षार्थी कडून अर्जापोटी २५ कोटी शासनाच्या तिजोरीत जमा करून घेतले आहेत. मात्र परीक्षा घेण्यास कुठली हालचाल सध्या तरी दिसत नाही त्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये सरकार विरुद्ध रोष निर्माण झाला आहे.

  २०१९ च्या सुरुवातीला राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ३४ जिल्हामध्ये बम्पर पदभरतीची जाहिरात निघाली होती. एकूण १३ हजार ५२१ जागेसाठी ही पदभरती प्रक्रिया होती. चार वर्षाच्या कालावधीनंतर पदभरती निघाल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नोकरीच्या आशेने परीक्षेची तयारी सुरू केली. बाहेरगावी शिक्षण घेवून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यानी तर ऊसनवारी पैसे घेऊन आपला अर्ज भरला होता. यामध्ये प्रवर्ग ओपन करीता ५०० रूपये ( एका पोस्ट साठी) तसेच आरक्षित वर्गासाठी ( SC / ST = २५०  (एका पोस्ट साठी ) फी आकरण्यात आली होती. बम्पर पदभरती होणार असल्याने राज्याभरातून १२ लाख ७२ हजार ३१९ परिक्षार्थ्यांनी आपले अर्ज दाखल करून परिक्षेची तयारी सुरू केली. परंतु, अशातच कोरोना महामारी सारखे संकट आले त्यामुळे सरकारने सर्व पद भरती प्रक्रीया रद्द करून आगामी काळात पद भरती घेवू, असे म्हणून विद्यार्थ्यांना आश्वस्त केले. मात्र, आज रोजी करोनाचे संकट टळले असून सर्व घटक पूर्वपदावर आले आहे. अशा स्थितीत पदभरती होईल, या आशाने विद्यार्थी आहेत.

  अर्जापोटी २५ कोटी ८७ हजाराचा महसूल तिजोरीत

  ग्रामविकास विभागाने  जिल्हापरिषद पदभरती बाबत मार्च २०१९ रोजी जाहिरात काढून विविध पदांचे अर्ज भरून घेतले. सुशिक्षित बेरोजगार, ज्यांना शासकीय नोकरीची गरज आहे. अश्या गरीब गरजू युवकांनी जिल्हा परिषद पदभरतीसाठी अर्ज केले. त्यांची संख्या १२ लाख ७२ हजार ३१९ अशी आहेत. त्या अर्जापोटी २५ कोटी ८७ लाख रु शासनाला मिळाले. मात्र आज चार वर्ष लोटूनही नोकर भरती घेतली नाही.

  शासनाने जर जिल्हापरिषद पदभरती लवकर घेतली नाही तर, सरकार बद्दल युवकांमध्ये प्रचंड मोठा रोष निर्माण होऊ शकतो, वेळीच परीक्षा घेऊन पदभरती केल्यास जनतेला सुद्धा चांगली सेवा सुविधा मिळू शकते, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जनतेला विहित मुदतीत सेवा मिळत नाहीये, त्यामुळे शासनाने तात्काळ पदभरती घ्यावी.

  – विशाल ठाकरे, विद्यार्थी प्रतिनिधी

  पदभरतीचे पदे

  कनिष्ठ अभियंता

  कनिष्ठ अभियंता

  गारगसेवक(Gramsevak)

  औषध निर्माता

  प्रयोगशाळा तंत्रज्ञ

  आरोग्य सेवक

  आरोग्य सेविका

  विस्तार अधिकारी (कृषी)

  विस्तार अधिकारी (संखीकी)

  थापत्या(sthapatya)अभियांत्रिकी सहाय्यक

  पशुधन पर्यवेक्षक

  आरोग्य सेवक

  वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

  वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)

  सेविका (अंगणवाडी)

  कनिष्ठ लेखाधीकारी

  कनिष्ठ यांत्रिकी