शिंदे गटातील १२ आमदार संपर्कात; राऊतांचा दावा

ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा इतर कोण असतील हे सर्व आता एकमेकांच्या उरावर बसण्यास सुरूवात करतील. त्यामुळे हे मंत्रिमंडळ औटघटकेचे मंत्रिमंडळ असेल यात कोणतीही शंका नाही, असे ते म्हणाले. त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. सध्या काही जण अस्वस्थ आहेत आणि त्यापैकी १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेना नेते विनायक राऊत राऊत यांनी केला.

    मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होत आहे. त्यातच शिवसेना (Shivsena) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिंदे गटातील १२ आमदार संपर्कात असल्याचा दावा असल्याचे त्यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

    राऊत म्हणाले की, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, मग ते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) असतील किंवा इतर कोण असतील हे सर्व आता एकमेकांच्या उरावर बसण्यास सुरूवात करतील. त्यामुळे हे मंत्रिमंडळ औटघटकेचे मंत्रिमंडळ असेल यात कोणतीही शंका नाही, असे ते म्हणाले. त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. सध्या काही जण अस्वस्थ आहेत आणि त्यापैकी १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.