Shiv Sena Minister Gulabrao Patil's reaction to Yogi Adityanath's announcement of Film City

खासदार राहुल शेवाळेंच्या पत्रावरुन (MP Rahul Shewale Letter) काही खासदार सुद्धा शिंदे गटात सामील होणार का, यावर जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुनच आता आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार व 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

    जळगाव : राज्यात सत्तांतर झाले आहे. मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. शिंदे सरकारला १६४ मते मिळाली, तर विरोधात ९९ मते पडली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप तसेच ऐकमेकांची उणीधुणी काढण्याचे काम सुरु आहे.

    दरम्यान, शिवसेनेतील नाराज ४० आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात (Shivsena 40 MLA Join Shinde Group) सामील होत भाजपाबरोबर नवीन सरकार स्थापन केले आहे. आता शिवसेनेच्या आमदारांनी साथ सोडल्यानंतर खासदारसुद्धा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. खासदार राहुल शेवाळेंच्या पत्रावरुन (MP Rahul Shewale Letter) काही खासदार सुद्धा शिंदे गटात सामील होणार का, यावर जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुनच आता आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार व 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, ‘ते 12 खासदार कोण?’ यांचा दबक्या आवाजात शोध सुरु आहे.

    उद्धव ठाकरेंना आम्ही सोडले नाही, तर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडले. आम्ही वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सावध केले. त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला असं पाटील म्हणाले. शिंदे सरकार स्थापनेनंतर बंडखोर माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) प्रथमच जळगावमध्ये आले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार व 20 माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.