twelve year old boy death

रेहान शेख हा कैलास नगर परिसरात कुटुंबासह राहत होता. आज सकाळच्या सुमारास शाळेतून परत येताना तो कैलास नगर परिसरातील मोकळ्या जागेवर खेळत होता. याच ठिकाणी एका बिल्डरने इमारतीसाठी खड्डा खोदून ठेवला होता या खड्ड्यात पाणी साचलेले होते.

कल्याण: इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका बारा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Small Boy Death) झाल्याची घटना कल्याण (Kalyan) पूर्व कैलास नगर परिसरात घडली. रेहान शेख (Rehan Shekih) असं या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रेहान शेख हा कैलास नगर परिसरात कुटुंबासह राहत होता. आज सकाळच्या सुमारास शाळेतून परत येताना तो कैलास नगर परिसरातील मोकळ्या जागेवर खेळत होता. याच ठिकाणी एका बिल्डरने इमारतीसाठी खड्डा खोदून ठेवला होता या खड्ड्यात पाणी साचलेले होते. रेहानचा बॉल या खड्ड्यात गेल्याने रेहान बॉल काढण्याचा प्रयत्न करू लागला. या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि रेहान खड्ड्यातील पाण्यात पडला.

काही नागरिकांचं याकडे लक्ष गेलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रेहानला शोधण्याच कार्य सुरू केलं. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर रेहानचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला. रेहान या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्यानंतर खड्ड्यातील गाळात रुतला व त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

दरम्यान संबंधित बिल्डरने या ठिकाणी खड्डा खोदला मात्र सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केली नाही. साधी संरक्षक भिंत बांधण्याची तसदीदेखील बिल्डरने घेतली नाही. त्यामुळे भविष्यात देखील या ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे.