कोरोनाचा धोका वाढला! कोरोनाच्या रजेवर असलेल्या 12 हजार कैद्यांना तुरुंगात हजर होण्याचे आदेश

जगात कोरोनाचा उद्रेक कमी झालाय परंतू चीन व इतर काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसतो आहे. भारतातही काही भागात कोरोनाने तोंड वर केल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना रूग्णसंख्येत वाढ दिसून आल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. कोरोनाच्या रजेवर असलेल्या 12 हजार कैद्यांना तुरुंगात हजर होण्याचे आदेश देण्यात आलेत(12,000 prisoners on corona leave ordered to appear in jail).

    मुंबई : जगात कोरोनाचा उद्रेक कमी झालाय परंतू चीन व इतर काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसतो आहे. भारतातही काही भागात कोरोनाने तोंड वर केल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना रूग्णसंख्येत वाढ दिसून आल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. कोरोनाच्या रजेवर असलेल्या 12 हजार कैद्यांना तुरुंगात हजर होण्याचे आदेश देण्यात आलेत(12,000 prisoners on corona leave ordered to appear in jail).

    संपूर्ण राज्यात जवळपास 12 हजार कैदी कोरोनाच्या रजेवर आहेत. कोविड निर्बंधांना 1 महिना उलटून गेल्यानंतर सरकारने रजेवर असलेल्या सर्व कैद्यांना हजर होण्याची नोटीस पाठवली. नोटीस मिळाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत सर्व कैद्यांना वेळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्यात अनेक ठिकाणी सर्वे करण्यात आले होते. ऑपरेशन मालेगाव मॅजिक द्वारे केलेल्या सर्व्हेमध्ये मालेगाव अव्वलस्थानी आहे. नागरिकांमध्ये 96 टक्के रोग प्रतिकार शक्ती असल्याचे या सर्वेमधून समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसरा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

    कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने मास्क वापरण्याचं आवाहन केले आहे. मास्कचा वापर सरकारने अजूनही ऐच्छिक ठेवला असला तरीही गेल्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांना मास्क वापरा अशा सूचना राज्य सरकारद्वारे करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रूग्णांची आकडेवारील वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता धोका टाळण्यासाठी प्रवासात मास्क वापरावा असे आवाहन रेल्वे प्रशासनानेही केले आहे.