आजपासून सुरु होणार बारावीची बोर्ड परीक्षा; 15,13,909 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून (दि. 21) सुरुवात होत आहे.

    छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून (दि. 21) सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा होणार आहेत.

    राज्यातील एकूण 1,00,497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15,13,909 नोंदणी झाली आहे. त्यात 8,21,450 विद्यार्थी तर 6,92,424 विद्यार्थिनी असणार आहेत. त्यासाठी 3320 केंद्र उपलब्ध असणार आहेत. याशिवाय, विज्ञान शाखेतून 7,60,046, कला शाखेतून 3,81,982 तर वाणिज्य शाखेतून ३,२९,९०५ आणि व्होकेशनल शाखेतून 37,226. आयटीआयतून 4750 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

    अशाप्रकारे विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3320 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे.