सोलापूर जिल्हा परिषद हिरक महोत्सवानिमित्त १३ माजी अध्यक्षांचा शुक्रवारी सन्मान

जिल्हा परिषद स्थापनाचे ६० वर्ष पुर्ण झाल्याने त्या निमित्ताने हिरकमहोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.  

    सोलापूर : जिल्हा परिषद स्थापनाचे ६० वर्ष पुर्ण झाल्याने त्या निमित्ताने हिरकमहोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी दिली.

    या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेच्या १३ माजी अध्यक्षांचा शुक्रवारी सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी एक वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे.

    या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मार्फत मागील ६० वर्षामध्ये ग्रामीण भागातील विकास व ग्रामीण भागातील नागरीकांचे राहणीमान उंचवणे व गावोगावी पायाभूत व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यामध्ये विशेष कार्य व योगदान केलेल्या मागील ६० वर्षातील कालावधीतील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

    माजी अध्यक्षांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, काकासाहेव रामचंद्र निंबाळकर, बाबुराव मारुती जाधव, फत्तेसिंह व्यंकटराव मानेपाटील, मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, वैशाली लक्ष्मण सातेपुते, सुमन वसंतराव नेहतराव, बळीराम भाऊराव साठे, निशिगंधा प्रशांत माळी, जयमाला महादेव गायकवाड, आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे, शिवानंद सिद्रामप्पा पाटील, अनिरुद्ध विठ्ठल कांबळे यांचा समावेश आहे.

    तसेच आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत ज्या ग्रामपंचायतीने त्या योजनेंतर्गत चांगले काम करुन सदर योजनेचे उद्दिष्ट पुर्ण केल्याने जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतीना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री यांच्या हस्ते या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे.

    अक्कलकोट-भुरी कवठे

    बार्शी-यावली

    करमाळा-सरपडोह

    माढा- जामगाव

    माळशिरस-यशवंत नगर,

    पंढरपूर-पुळूज

    मंगळवेढा-लवंगी

    मोहोळ-पापरी

    उत्तर सोलापूर-मार्डी

    सांगोला-अकोला

    दक्षिण सोलापूर-होटगी

    सोलापूर जिल्ह्यामधील यशस्वीरित्या काम केलेल्या ग्रामसेवकांना सन 2017-2018 ते 2020-2021 या कालावधीतील सुमारे 44 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते सन्मानीत करण्यात येणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.

    या निमित्ताने उपस्थितीना गेल्या वर्षात सीईओ दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमाचे माहिती पट दाखविण्यात येणार आहेत.