मुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

मुंबईत आज १३० नव्या कोरोना रूग्णांची (Corona Patients In Mumbai)  नोंद झाली आहे. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

    मुंबई : कोरोना रूग्णांच्या (Corona Patients) संख्येत चढ-उतार होत आहे.  मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत १३० नव्या कोरोना रूग्णांची (Corona Patients In Mumbai)  नोंद झाली आहे. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. तर आज १२१ रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईतील कोरोनामुक्तीचा दर ९८. २ टक्के एवढा आहे. आज १४ रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसल्याने या रूग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.

    राज्यातील सर्वात जास्त सक्रिय रूग्ण हे मुंबईत होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये यात घट होऊन मुंबई आता राज्यात सक्रिय रूग्णांच्या संख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या मुंबईत ६९७ सक्रिय रूग्ण आहेत. राज्यात सध्या सर्वाधित सक्रिय रूग्ण हे पुण्यात आहेत. दिलादायक बाब म्हणजे गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील नव्या रूग्णांसह सक्रिय रूग्णांमध्ये देखील घट होत आहे. कोरोना रूग्णांमध्ये घट होत असली तरी संपूर्ण धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.