13th death at maharashtra bhushan award ceremony death update shri sevak gulab patil passes away nrvb

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 7 लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. भर उन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला असल्याची टीका विरोधकांनी या निमित्ताने केली आहे.

    नवी मुंबई : खारघर (Kharghar) येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात (Maharashtra Bhushan Award ceremony) 11 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला (11 People Died Due To Heatstroke). त्यानंतर सोमवारी उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे या सोहळ्यात उष्माघातामुळे बळी गेलेल्यांचा आकडा आता 13 वर पोहोचला आहे. विरार (Virar) येथील श्री सेवक गुलाब पाटील (Shree Sevak Gulab Patil) यांचं नुकतच निधन झालं आहे. त्यांच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.  अद्यापही काही जणांची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 7 लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. भर उन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला असल्याची टीका विरोधकांनी या निमित्ताने केली आहे.

    7 तास लोक उन्हात

    दरम्यान, महाराष्ट्र भूषम पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी 10.30 वाजेचा होता. मात्र सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, सचिन धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमीत शहा आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भाषणे झाली. सूत्र संयोजकांनी मोठा वेळ घेतला. परिणामी हा कार्यक्रम तब्बल 1 वाजता संपला. सेवकांना कार्यक्रम स्थळातून बाहेर पडण्यास तीन ते चार तास लागले. परिणामी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 7 लाख लोक उन्हात होते. दोन दिवस खारघरचे सर्व मुख्य रस्ते बंद आहेत. शाळा व कार्यालयांना सुट्ट आहे. स्थानिक रिक्षा, परिवहन वाहतूक सर्व बंद होती. 250 टॅंकर आणि 2 हजार नळ, 69 रुग्णावाहिका, 350 डॉक्टर्स, 100 नर्स कार्यरत होते. प्रशासनाला वेठीस धरुन हा कार्यक्रम झाला.

    मुख्यमंत्र्यांचा हट्ट

    मुख्यमंत्री शिंदे स्वत: रेवदंड्याच्या श्री समुदाय परिवारातील आहेत. त्यामुळे जंगी कार्यक्रम त्यांना करायचा होता. तसेच गृहमंत्र्यांसमोर आपण २० लाख लोक जमवू शकतो, असा मोठेपणा त्यांना मिरवायचा होता. त्यामुळे दुपारी आणि प्रशासनाला वेठीस धरून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

    मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    कालचा महाराष्ट्र भूषण कार्यक्रम हा भर उन्हात ठेवण्यात आला होता. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा.

    -अतुल लोंढे, काँग्रेस प्रवक्ता