14 काळविटं अन् हरणांचा दुर्दैवी मृत्यू, कळप उड्डाणपूलावरुन कोसळला; सोलापूर जिल्ह्यातील घटना

सोलापूर - पुणे (Solapur-Pune) राष्ट्रीय महामार्गावरील (Mahamarg) नव्याने तयार करण्यात आलेल्या विजापूर (Vijapur) बायपास उड्डाणपुलावरून पडल्याने 14 काळविट व हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास केगाव गावाजवळ घडली. या घटनेची माहीती मिळताचं वन विभागाचे पथक दाखल झाले.

    सोलापूर : सोलापूर – पुणे (Solapur-Pune) राष्ट्रीय महामार्गावरील (Mahamarg) नव्याने तयार करण्यात आलेल्या विजापूर (Vijapur) बायपास उड्डाणपुलावरून पडल्याने 14 काळविट व हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास केगाव गावाजवळ घडली. या घटनेची माहीती मिळताचं वन विभागाचे पथक दाखल झाले.

    कळप कसा कोसळला?

    प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार केगाव परिसरातील हरणांचा कळप हा दैनंदिन संचार करत असल्याची माहिती स्थानिकांकडून प्राप्त होत आहे. अनेक वेळा अशा घटना घडतात. हरणांचा कळप जात असताना नॅशनल हायवे वरील वाहनांच्या ताफ्याचा वेग मोठ्या प्रमाणात असतो कर्णकर्ष हॉर्नच्या आवाजामुळे हरणं सैरभैर होऊन पळत सुटतात त्यामुळे अपघात घडत असतात. उड्डाण पुलावरून हरणाचा कळप वाहनांच्या कर्णकर्ष आवाजामुळेच कोसळल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. जखमी हरणांवर उपचार करण्यात येत आहेत.