खडकवासला धरणातून १४ हजार क्युसेकने विसर्ग

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी काहीसा कमी झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग १८ हजार क्युसेकवरून १४ हजार ८०१ करण्यात आला.

    पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी काहीसा कमी झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग १८ हजार क्युसेकवरून १४ हजार ८०१ करण्यात आला. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून केवळ टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा आहे. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ५५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ४२ मि.मी, पानशेत धरण परिसरात ४५ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात पाच मि.मी. पाऊस पडला. खडकवासला धरणातून मुठा नदीत रात्री दहा वाजल्यापासून १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. मात्र, रविवारी सकाळपर्यंत चारही धरणांच्या परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला.