देऊळगावराजेत १५ एकर उस जळून खाक

देऊळगावराजे ( ता. दौंड) परिसरातील आर्वी फाटा येथे रविवारी (दि. २०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उसाला आग लागून १५ एकर उस जळून खाक झाला. आगीचे कारण  समजू शकले नाही.

    देऊळगावराजे : देऊळगावराजे ( ता. दौंड) परिसरातील आर्वी फाटा येथे रविवारी (दि. २०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उसाला आग लागून १५ एकर उस जळून खाक झाला. आगीचे कारण  समजू शकले नाही.

    या आगीत सहा शेतकऱ्यांचा उस जळाला आहे.सगळा खोडवा उस आहे. सध्या साखर कारखाना सुरु असल्याने   जळालेला ऊस गाळप होऊ शकतो, पण जळीत उसाचे पेमेंट कटिंग होऊन शेतकऱ्यांचे हजारो रूपये नुकसान  होणार आहे. या आगीत दादा गिरमकर या शेतकऱ्याची बांधावरील आंबा आणि नारळाची झाडे सुध्दा जळाली आहेत. किमान या झाडांचा तरी पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित  शेतकऱ्याने केली आहे.