Launch of Live Radio App is an Innovative Initiative of Collectorate - Statement of Guardian Minister Eknath Shinde

आमदार महेश शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरेगाव शहराच्या 'हार्ट ऑफ सिटी' असलेल्या आझाद चौकामधे भव्य व्यापारी संकुल व भाजी मंडई उभारण्यात येणार असून, त्यासाठी आमदार शिंदे यांच्या शिफारसीनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निधी मंजूर केला.

    कोरेगाव : आमदार महेश शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरेगाव शहराच्या ‘हार्ट ऑफ सिटी’ असलेल्या आझाद चौकामधे भव्य व्यापारी संकुल व भाजी मंडई उभारण्यात येणार असून, त्यासाठी आमदार शिंदे यांच्या शिफारसीनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आठ कोटी दहा लाख रुपये आणि शहरातील इतर विविध विकासकामांसाठी सहा कोटी ९० लाख असे एकूण १५ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे व नगर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

    शहरात विविध विकासकामे सुरू असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांनी नुकतीच नगरविकास आघाडी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, नगरविकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे आदींची संयुक्त बैठक घेतली.

    त्यातून सर्वांच्या शहराच्या सर्वांगीण विकासाबाबतच्या विविध सूचना, कल्पना जाणून घेतल्या. त्यानंतर आपल्या स्वतःच्या संकल्पनेतील आझाद चौकातील व्यापारी संकुल व भाजी मंडई नवीन इमारत बांधकामासह शहरातील विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करून ते नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे स्वतः सादर केले होते. त्याला नगरविकासमंत्री शिंदे यांनी नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य योजनेंतर्गत तत्काळ मंजुरी देऊन नगरपंचायतीकडे निधीही वर्ग केला आहे. या सर्व विकासकामांसाठी नगरपंचायतीला कसलाही स्वतःचा निधी खर्च करावा लागणार नाही. सर्व मंजूर निधी हा शासन देणार आहे.