खोडाळा येथे १५ लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जन्य पानमसाला जप्त; गुटखा भरलेली वाहन मुद्देमालासह ताब्यात

मोखाडा तालुक्यातील खोडाळा बाजारपेठेतील किराणा मालाचे व्यापारी भोरु बिन्नर यांचा आपल्या गाळ्यातील व ताब्यातील वाहनातील गुटखा जप्त करण्यात आला.

    मोखाडा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा बाजारपेठेतील किराणा मालाचे व्यापारी भोरु बिन्नर यांचा आपल्या गाळ्यातील व ताब्यातील वाहनातील एकूण वाहनासह २५ लाख ६२ हजार १०० रुपये किंमतीचा सुमारे ९४७ किग्रॅम वजनाचा प्रतिबंधित सुगंधी सुपारी तंबाखू जन्य माल ताब्यात बाळगला असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत मिळून आला असून पोलिसांनी आरोपी व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी भोरु बिन्नर (२९) आणि संजय नारायण मराठे रा.हिरावाडी पंचवटी नाशिक या दोघांना ताब्यात घेतले असून शनिवार पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई यांनी सांगितले आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा केसर युक्त विमल पान मसाला,६० हजार रुपयांची व्ही एन तंबाखू,३ लाख ७६ हजार केसर युक्त विमल पान मसाला,२४ हजार रुपयांची व्ही एन तंबाखू,५ लाख ५४ हजार रुपये किंमतीचा विमल केसर युक्त पानमसाला,६१ हजार रुपये किंमतीचा व्ही एन तंबाखू,३२ हजार रुपये किंमतीचा पारस पानमसाला,७५ हजार रुपये किंमतीचा पी वन तंबाखू,३० हजार रुपये किंमतीचा वाह पान मसाला,३ हजार ७५० रुपये किंमतीचा डब्ल्यू विविंग टोबॅको,८१ हजार ९०० रुपये किंमतीचा हिरा पानमसाला,४० हजार ९५० रुपये किंमतीचा रॉयल ७१७ तंबाखू तसेच ५ लाख ५० हजार रुपयांची सफेद रंगाची बोलेरो पिक अप एम एच १५ एच एच ७८८३,५ लाख रुपयांचा सफेद बोलेरो पिक अप टेम्पो क्र एम एच १५जी व्ही ०८८६ असा एकूण २५ लाख ६२ हजार १०० रुपये किंमतीचा वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर वाहने मोखाडा पोलिस ठाण्यात जप्त असून आरोपी भोरु बिन्नर व संजय नारायण मराठे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शनिवार पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याचे तपास अंमलदार स्वप्निल सावंत देसाई यांनी सांगितले आहे.

    मोखाडा तालुक्यातील प्रतिबंधित तंबाखू जन्य पानमसाला जप्त होण्याची ही सर्वात मोठी कारवाई असून या घटनेमुळे मोखाडा तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.