पुण्यातून अयोध्यासाठी १५ विशेष रेल्वे; दर दोन दिवसांनी एक ट्रेन धाणार

प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून (दि.३०) जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे ट्रेन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दर दोन दिवसांनी एक ट्रेन अयोध्येसाठी धावणार आहे.

    पुणे : प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून (दि.३०) जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे ट्रेन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दर दोन दिवसांनी एक ट्रेन अयोध्येसाठी धावणार आहे. या सर्व गाड्या स्लीपर कोचच्या असणार आहेत. या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून पुढे विशेष गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
    २२ जानेवारीला अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी पुण्यातूनही मोठ्या संख्येने भाविक जाणार आहेत. त्यांच्या सुविधेसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने बोर्डाला प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार बोर्डाने पुण्यातून ३० जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्यात १५ विशेष रेल्वे अयोध्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
    पुणे अयोध्या पुणे रेल्वे सेवेसाठी तीन रेकचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. अयोध्यावरून देखील पुण्यासाठी येण्यासाठी १५ विशेष रेल्वे असतील. यासाठीचे बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. कोल्हापूरहून देखील अयोध्यासाठी विशेष गाडी सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण, कोल्हापूर येथून अयोध्यासाठी गाडी सुरू झाल्यास पुण्यातील प्रवाशांना आणखी एक गाडी मिळणार आहे.