मलकापूरमध्ये सर्वसाधारणसाठी १६ जागा ; नगपालिकेसाठी १० प्रभागाची आरक्षण सोडत निश्चित

मलकापूर नगरपरिषदेची पालिका सभागृहात निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मार्गदर्शक सुचनेप्रमाणे अनुसुचित जाती महिलांसाठी चिठ्ठी पद्धतींनी पन्ह्यळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्या उपस्थितीत पार पडली.

  शाहुवाडी : मलकापूर नगरपरिषदेची पालिका सभागृहात निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मार्गदर्शक सुचनेप्रमाणे अनुसुचित जाती महिलांसाठी चिठ्ठी पद्धतींनी पन्ह्यळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्या उपस्थितीत पार पडली.

  प्रारंभी मुख्याधिकारी तथा प्रशासनाधिकारी विद्या कदम यांनी या आरक्षणाबाबत माहिती दिली.यात प्रभाग संख्या, सदस्य संख्या, अनुसुचित जाती साठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार आरक्षण, सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा व प्रभागाची व्याप्ती वाचून दाखवण्यात आली. यावेळी डीपीआयचे रमेश चांदणे, माजी उपनगराध्यक्ष भारत गांधी, मनसेचे सतीश तांदळे, किशोर सणगर आदी उपस्थित होते.

  अनुसुचीत जातीसाठी आरक्षित
  अनुसुचीत जातीसाठी आरक्षित प्रभाग १,५,६ व ७ अ या प्रभागातील स्त्रि आरक्षणासाठी चिठ्ठी पध्दतीने लहान मुलांच्या हस्ते आरक्षण काढण्यात आले‌. अनुसुचित ४ जागा पैकी प्रभाग ५ अ व ६ आ अनुसुचित जाती स्त्री प्रवर्गासाठी जाहिर करण्यात आले.

  काेणत्या प्रभागात काेणते अारक्षण
  अनुसुचित जाती साठी प्रभाग -१ अ, ५ अ व ६ अ स्त्री, ७ अ. सर्वसाधारण प्रभागातील स्त्री आरक्षण निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे थेट आरक्षण काढण्यात आले. यात सर्वसाधारण स्त्रीसाठी  प्रभाग १ ब, २ अ, ३ अ, ४ अ, ७ बं, ८ अ, ९ अ, १० अ. सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग २ ब, ३ ब, ४ ब, ५ ब, ६ ब, ८ ब,९ ब, १० ब या आठ प्रभागात ८ स्त्रीच्या व ८ सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहिर करण्यात आल्या.