पद्मभूषण पुरस्कार घोषित! गुलाम नबी आझाद, राशिद खान, सायरस पुनावाला यांच्या नावाचा आहे समावेश

    प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून एकूण 128 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये 17 पद्मभूषण पुरस्कारांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रासाठी गुलाम नबी आझाद, कला क्षेत्रात राशिद खान, व्यापार आणि उद्योग क्षेत्रात सायरस पुनावाला यांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे.

    सायरस पुनावाला (व्यापार आणि उद्योग क्षेत्र)
    जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांची व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनाची लस कोवीशिल्ड लस बनवली आहे. भारतासोबतच जगातील अनेक देशांना त्याचा पुरवठा केला आहे.

    गुलाम नबी आझाद (सार्वजनिक क्षेत्र)

    कांग्रेस नेता आणि जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आजाद यांना पद्मभूषण सम्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.
    गुलाम नबी आजाद जम्मू-कश्मीर से राज्यसभा सदस्य होते. 2005 से 2008 पर्यंत त्यांनी जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचं पद सांभाळल. गुलाम नबी हे सुमारे 41 वर्षे संसदीय राजकारण आझाद 2014 पासून राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. ते पाच वेळा राज्यसभेचे तर दोन वेळा लोकसभेचे खासदारही होते.

    ‘यांनाही’ मिळणार पद्मभूषण पुरस्कार
    बुधादेब भटर्जी
    राशिद खान
    विक्टर बॅनर्जी
    सुंदर पिच्चई
    नटरंजन चंद्रशेखरन
    वशिष्ट त्रिपाठी
    स्वामी सचिदानंद
    प्रतिभा रे
    संजय राजाराम (मरणोपरांत)
    सत्या नडोला
    राजीव महर्षी
    देवेन्द्र झाझरिया
    मधुर जाफरी