17 th gold thumbs stolen from doctor by beating with fear of knife

लूटारुंनी चाकू काढला व डॉक्टरांच्या गळ्याला लावला. त्यांना कारमध्ये बसवून कार घेवून कॉटन मार्केट जवळच्या ‘एटीएमवर नेली. तेथे त्यांना एटीएममधून पैसे काढण्यास सांगितले. परंतु, एटीएममधून रक्कम निघाली नाही. त्यामुळे, लूटारुंनी डॉक्टरांच्या हातातील दोन अंगठ्या जबरीने हिसकावून घेतल्या. यामध्ये एक अंगठी दहा ग्रॅम तर दुसरी सात ग्रॅमची अशी एकूण १७ ग्रॅमच्या दोन अंगठ्या किंमत ९० हजार रुपये लंपास केला आहे.

    अमरावती : कारने घरी जात असताना एका डॉक्टरला रस्त्यात थांबविले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील ९० हजार रुपयांची सोन्याची अंगुठी हिसकावून नेली. ही घटना शहरातील सिंधी चौकात असलेल्या रामलक्ष्मण संकुलजवळ रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी गाडगेनगर एका लूटारुला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

    डॉ. जगदिश कृष्णराव बावने (४०, रा. म्हाडा कॉलनी, पत्रकार कॉलनीजवळ, अमरावती) हे मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या कार क्रमांक एमएच ०३ एआर ११०३ ने घरी परत जात होते. लघुशंकेसाठी ते सिंधी चौकात राम लक्ष्मण संकुल जवळ थांबले. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले व त्यांनी डॉ. जगदिशला मारहाण सुरू केली. तसेच, त्यांच्या जवळचा मोबाईल हिसकावून त्यांना पैश्याची मागणी केली. त्यांच्या खिशात रक्कम नव्हती, त्यामुळे लूटारुंनी चाकू काढला व डॉक्टरांच्या गळ्याला लावला. त्यांना कारमध्ये बसवून कार घेवून कॉटन मार्केट जवळच्या ‘एटीएमवर नेली. तेथे त्यांना एटीएममधून पैसे काढण्यास सांगितले. परंतु, एटीएममधून रक्कम निघाली नाही.

    त्यामुळे, लूटारुंनी डॉक्टरांच्या हातातील दोन अंगठ्या जबरीने हिसकावून घेतल्या. यामध्ये एक अंगठी दहा ग्रॅम तर दुसरी सात ग्रॅमची अशी एकूण १७ ग्रॅमच्या दोन अंगठ्या किंमत ९० हजार रुपये लंपास केला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी डॉक्टरच्या तक्रारीवरुन मंगळवारी मध्यरात्री दोघांविरुध्द लुटमारीचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. लूटारुचे नाव स्वप्नील सुभाष भगत (२३ रा. विलासनगर, अमरावती) असे आहे. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.