18.56 crore share market case mastermind Kariya in police custody from Mumbai jail

आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्या लोकांनी तेजी मंदी डॉट कॉम आणि परेश कारियाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केली. काही महिन्यानंतर परेश कारिया याने गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून एडलवाइज नावाच्या कंपनीकडून कर्ज घेतले आणि गुंतवणूकदारांचे शेअर्स (Shares of investors ) आणि म्युच्युअल फंड (Mutual funds) या कंपनीकडे गहाण ठेवले.

  अमरावती : शहरासह जिल्ह्यातील ७८ गुंतवणूकदारांची शेअर मार्केटच्या (Share market) नावावर सुमारे १८.५६ कोटी रुपयाने फसवणूक (Fraud) झालेल्या घोटा‍ळ्यातील मुख्य आरोपी परेश कारिया याला मुंबई कारागृहातून ताब्यात (Detained from Mumbai Jail) घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेची (Economic Offenses Branch) टीम बुधवारी, ३ ऑगस्ट रोजी मुंबईला रवाना होणार आहे. परेश कारियाला ताब्यात घेतल्यावर १८.५६ कोटींच्या फसवणूकीच्या तपासाला गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

  शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावावर ७८ गुंतवणूकदारांचे म्युच्युअल फंड आणि शेअर्स परस्पर विकल्या गेले. या प्रकरणात तेजी मंदी डॉट कॉम (Teji Mandi.com) चे संचालक अनिल गांधी (Director Anil Gandhi) आणि अनुग्रह स्टॉक दल अँड ब्रोकर्स प्रा. लि. (Anugrah Stock Dal & Brokers Pvt. Ltd.) चे परेश करिया हे दोघे मुख्य सुत्रधार होते. या दोघांसह अन्य चार जणांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात (City Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला तपासासाठी आरोपींची चौकशी करायची आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी परेश कारियाला मुंबई पोलिसांनी अटक केली होत. तो सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. अशा परिस्थितीत यांच्यासह अन्य आरोपींचा शोध घेताना त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन समन्स बजावणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बुधवार, ३ ऑगस्ट रोजी मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी दिली.

  गुंतवणूकदारांमध्ये खळबळ

  आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्या लोकांनी तेजी मंदी डॉट कॉम आणि परेश कारियाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केली. काही महिन्यानंतर परेश कारिया याने गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून एडलवाइज नावाच्या कंपनीकडून कर्ज घेतले आणि गुंतवणूकदारांचे शेअर्स (Shares of investors ) आणि म्युच्युअल फंड (Mutual funds) या कंपनीकडे गहाण ठेवले.

  दरम्यान, कारिया यांनी कर्ज न भरल्याने एडलवाईस कंपनीने गुंतवणूकदारांना कोणतीही माहिती न देता त्यांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड विकले. त्यामुळे संबंधित गुंतवणूकदारांचे पैसे त्यांच्या नकळत बुडाले. याची माहिती मिळताच देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून अनुग्रह कंपनीविरोधात विविध शहरात पोलिसांत तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत.

   ऋषभ सिकची यांची तक्रार

  या अंतर्गत ऋषभ सिकची यांनी देखील अमरावती शहरासह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांच्या वतीने स्थानिक सिटी कोतवाली पोलीस  (City Kotwali Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारावर परेश कारिया, तेजी मंदी डॉट कॉम चे संचालक अनिल गांधी आणि एडलवाईस कंपनी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या दोन अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.