
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत अवैध मद्य निर्मिती (Illegal manufacture of liquor), वाहतूक व मद्य विक्रीविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईत एकूण १८५ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ९२ वारसगुन्ह्यांमध्ये ९१ आरोपींना अटक करण्यात आली आहे
वर्धा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत अवैध मद्य निर्मिती (Illegal manufacture of liquor), वाहतूक व मद्य विक्रीविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईत एकूण १८५ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ९२ वारसगुन्ह्यांमध्ये ९१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ६ वाहन जप्त करण्यात आले असून, आरोपीकडून ४० लाख ८५ हजार २४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे एक निरीक्षक, तीन दुय्यम निरीक्षक, एक सहाय्यक दुय्यम निरिक्षक, सहा जवान व एक वाहन चालक असा तोकडा कर्मचारी वर्ग असतांनाही विभागाच्या वतीने सदर अवैद्य मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुध्द कारवाई करण्यात आली. नागरिकांनी त्यांच्या परिसरात होत असलेल्या अवैद्य भेसळयुक्त व बनावट दारु (Illicit adulterated and adulterated liquor) विक्रीची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८००२३३३९९९९ टोल फ्री व ८४२२००११३३ या राज्यस्तरीय व्हॉट्स ॲप क्रमांकावर किंवा ०७१५३-२४०१६३ या जिल्हास्तरीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.