खासदार निधीतून रस्ताच्या कंत्राटदाराकडे मागितली २ लाखाची खंडणी, आरोपी अटकते : न्यायालयीन कोठडी रवानगी

    कल्याण : सिमेट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम सुरु असताना एका व्यक्तीने कंत्राटदाराकडून २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याने कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंडणी मागणाऱ््या सुभाष भोसले याला अटक केली आहे. कल्याण न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

    कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील नाना पावशे चौक ते नुतन शाळेच्या दरम्यान ५५० मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून हे काम सुरु आहे. बिटकॉन इन्फ्रास्टक्चरला काम मिळाले आहे हे काम या संस्थेने कृषी कस्ट्रक्सनचे विजय भोसले आणि सुरेश काळे यांना दिले आहे. राजेश आढांगळे हा त्याठिकाणी मुकादम आहे. एका व्यक्तीने कामाच्या ठिकाणी वारंवार येऊन मजूर आणि मुकादम यांना मारहाण केली. त्याने त्यांच्याकडून २ लाख रुपयांची मागणी केली. सुहास भोसले असे या पैसे मागणाऱ्याचे नाव आहे. नोव्हेंबर महिन्यात येऊन त्याने आधी एका मजूराला मारहाण केली. त्यानंतर ११ डिसेंबरला संध्याकाळी येऊन मुकादम राजेश आढांगळेला मारहाण करुन तू तुझ्या मालकाला सांगितले की नाही पैसे देण्यास. पैसे दिले नसल्याने हे काम बंद कर असे धमकाविले. या प्रकरणात राजेश आढांगळे याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखील तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी आरोपी सुहास भोसले याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.