2 MLAs in the district not reachable! Accompanied by Eknath Shinde, Minister of State Bachchu Kadu and MLA Rajkumar Patel in Guwahati

शिवसेना आमदारांसोबत (Shiv Sena MLAs) जिल्ह्यातील दोन अपक्ष आमदार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आसाम राज्यातील गुवाहाटी (Guwahati) येथील हॉटेलमधून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बाहेर पडताना राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State Bachchu Kadu) व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल (Melghat MLA Rajkumar Patel ) दिसून आले आहे.

    अमरावती : विधान परिषद निवडणुकीनंतर  (Legislative Council elections) जिल्ह्यातील दोन आमदार देखील ‘नॉट रिचेबल’ (Not Reachable) असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदारांसोबत (Shiv Sena MLAs) जिल्ह्यातील दोन अपक्ष आमदार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आसाम राज्यातील गुवाहाटी (Guwahati) येथील हॉटेलमधून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बाहेर पडताना राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State Bachchu Kadu) व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल (Melghat MLA Rajkumar Patel ) दिसून आले आहे. शिवसेना आमदार ‘नॉट रिचेबल’ असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे टेंशन आणखीच वाढले आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्यावर नाराजी व्यक्त करीत राज्यसभा निवडणुकीत अपक्षांसह काही आमदारांनी क्रास व्होटींग (Cross voting) केल्याची चर्चा होती. त्यानंतर विधान परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत आमदारांचे महाविकास आघाडीसोबत असलेले बंड सर्वांसमोर उघड झाले आहे. शिवसेनेचे तत्कालीन गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनीच नाराज आमदारांची भेट बांधली. विधान परिषद निवडणूक होताच शिवसेनेचे आमदार गुजरात राज्यातील सुरत (Surat ) येथे पोहोचले.

    तेथून त्यांना आमास राज्यातील गुवाहाटी येथे नेण्यात आले. या नाराज आमदारांमध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार तथा राज्यमंत्री बच्चू कडू तसेच त्यांच्याच पक्षाचे मेळघाटाचे आमदार राजकुमार पटेल यांचा देखील नाराज आमदारांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गुवाहाटी येथे एका हॉटेलमधून एकनाथ शिंदे( Eknath Shinde ) यांच्या समवेत बाहेर पडताना राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State Bachchu Kadu) आणि आमदार राजकुमार पटेल (MLA Rajkumar Patel) दिसून आले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या आमदारांच्या निर्णयावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.