ऑनलाईन जुगार खेळणं पडलं महागात; सहाजण अटकेत

दौंड शहरातील शालिमार चौक येथील रस्त्याकडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अब्राहाम थॉमसन धोरखंडे हा आपल्या ओळखीच्या लोकांना मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जुगार अड्डा चालवीत असल्याची अशी खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली.

    दौंड : दौंड शहरातील शालिमार चौक येथे ऑनलाइन जुगारावर (Online Gambling) छापा टाकत एकूण ६ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांना अटक करण्यात आली. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

    दौंड शहरातील शालिमार चौक येथील रस्त्याकडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अब्राहाम थॉमसन धोरखंडे हा आपल्या ओळखीच्या लोकांना मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जुगार अड्डा चालवीत असल्याची अशी खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस पथक पाठवून तेथे छापा टाकला. या छाप्यामध्ये एकूण ६,८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    तसेच कुणाल गोपी खराटे (रा.शालिमार चौक, दौंड), पप्पू सुरेश तुपे (रा. शिर्सुफळ, ता. बारामती), ओमकार अंकुश गायकवाड (रा. शालिमार चौक, दौंड), तेजस बाबासो कांबळे (रा. सरपंच वस्ती, गोपाळवाडी, ता. दौंड ), रोहित युवराज सोनवणे (रा.कुरकुंभ मोरी, दौंड), अब्राहम थॉमस धोरखंडे (रा.शालिमार चौक, दौंड) यांना अटक करण्यात आली आहे.