2 storey house with luggage picked up in 13 days, height of two and a half feet house increased by one hundred and ten jack

कॉलम लेंटरला लागून खोदकाम सुरू केले आहे. खोदकाम कॉलमच्या समतल करण्यात आल्यानंतर कॉलम कट करून मग, एकशे दहा जॅकच्या मदतीने सदरचे घर १३ दिवसांत अडीच फूट उंचीपर्यंत उचलल्यावर कट केलेले कॉलम चार फूट उंचीपर्यंत उचलण्यात आले. त्यानंतर, पुन्हा वेल्डिंगच्या साह्याने जोडून काँक्रीटने भरती करण्यात येणार आहे.

    पथ्रोट : रस्ता बांधकामात रस्ता उंच तर घर खाली दबल्यामुळे पावसाळ्याचे पाणी घरात शिरून प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे हरियाणा येथील कंपनीच्या मार्फत एकशे दहा जॅक च्या आधारावर घर उचलण्याचे काम येथे सुरू झाले आहे. आता पर्यंत तेरा दिवसात संपूर्ण बांधकाम असलेले घर जमिनीपासून ११० जॅक लाऊन अडीच फूट उंच उचलले आहे.

    कॉलम लेंटरला लागून खोदकाम सुरू केले आहे. खोदकाम कॉलमच्या समतल करण्यात आल्यानंतर कॉलम कट करून मग, एकशे दहा जॅकच्या मदतीने सदरचे घर १३ दिवसांत अडीच फूट उंचीपर्यंत उचलल्यावर कट केलेले कॉलम चार फूट उंचीपर्यंत उचलण्यात आले. त्यानंतर, पुन्हा वेल्डिंगच्या साह्याने जोडून काँक्रीटने भरती करण्यात येणार आहे. या करिता दहा मजूर व साधारणत पंचवीस दिवसाचा कालावधी लागणार असून असे करताना कुठल्याही प्रकारचा दोष किंवा नुकसान होत नसल्याचे दिसून येत आहे.

    अडीच फूट उंचीपर्यंत घर उंच उचलले तरी घरातील भिंतीवर असलेले फोटो, घड्याळ, खिडक्या, आरमारी मध्ये असलेले सामान जशेच्या तसेच जागच्या जागेवर आहे. त्या वस्तूंना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले, नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कंपनीचे सर्व मजूर खोदकाम करत असलेल्या घरातील वरच्या मजल्यावर राहात आहेत.

    इमारतीला धोका नाही

    कोणत्याही प्रकारचा धोका इमारतींना होणार नाही, असे कंपनीच्या सुपरवायझरने सांगितले आहे. संबंधीत घर हे पथ्रोट येथील जयसिंग विविध कार्य सहकारी सोसायटीचे माजी संचालक कमलाकर दांडगे यांचे आहे. अकोला येथील तायडे यांचे घर जमिनीपासून चार फुटापर्यंत उचलले असल्याची माहिती मिळताच त्यांनी इंजिनीयर कांबळे यांच्यामार्फत माहिती घेऊन तायडे यांच्या घराची पाहणी केली. आपलेही दोन मजली असलेले घर रोडपासून चार फुटावर उचलण्यासाठी संबंधित कंपनीला कळविले होते. त्यानुसार बाराशे स्क्वेअर फूट असलेल्या घराला ११० जॅकच्या आधारावर  कॉलमच्या खालपासून तर मुळ जमिनीच्या वर अडीच फूट उंचीपर्यंत खोदून घर उचलले आहे.