राज्यात आज दिवसभरात 2 हजार 964 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रविवारी राज्यात तब्बल 2946 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1803 रुग्ण हे मुंबई शहरात आढळले आहेत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

    मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या दरम्यान रविवारी राज्यात तब्बल 2946 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1803 रुग्ण हे मुंबई शहरात आढळले आहेत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

    आज राज्यात 2946 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 1432 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज आढळलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून राज्याच्या राजधानीत आज 1803 रुग्णांची नोंद झाली.

    तर आज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या दोन राहीली आहे. दरम्यान राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 7.92 टक्के इके राहीले आहे. तर मृत्यूदर हा 1.86 टक्के राहीला.