file photo
file photo

वर्धा आणि बडनेरा दरम्यान रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

  ऐन दिवाळीच्या दिवशी नागपुर मार्गे जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा खोळंबा होण्याची चिन्ह आहेत. कारण वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

  वर्धा आणि बडनेरा दरम्यान रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी या दुर्घटनेमुळे प्रवाशांची परवड होण्याची शक्यता आहे. मुंबई- पुणे वरुन नागपुर अमरावती मार्गे सुटणाऱ्या गाड्यांना याच सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

  रद्द करण्याच आलेल्या ट्रेन

  वर्धा : भुसावळ Exp.
  नागपूर : सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
  नागपूर : अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस
  गोंदिया : कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
  नागपूर : पुणे एक्सप्रेस
  अजनी : अमरावती एक्सप्रेस

  मार्ग वळवण्यात आलेल्या रेल्वेगाड्या
  पुणे हटीया एक्सप्रेस ही चांदुर बाजार नरखेड मार्गे
  अहमदाबाद पुरी एक्सप्रेस
  शालिमार एक्सप्रेस
  हावडा सीएस एमटी एक्सप्रेस