rajendra patil yadrawkar

नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेला  क्रीडासंकुल उभारण्यासाठी २० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.  

  जयसिंगपूर :  नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेला  क्रीडासंकुल उभारण्यासाठी २० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

  शिरोळ तालुक्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार सेवा सुविधा देणारे अद्ययावत असे एखादे क्रीडासंकुल असावे.  तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी अशा संकुलाची गरज होती. याबाबत जयसिंगपूर नगरपरिषदेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे िनधी देण्याची मागणी केली होती. या निधीतून लवकरच अद्ययावत क्रीडासंकुल उभारले जाईल, असे अामदार पाटील यांनी म्हटले अाहे.

  नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन
  शिरोळ तालुक्यातील अनेक तरुणानी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. अनेक नवोदित खेळाडू त्या त्या क्रीडा प्रकारात सराव करीत आहेत. सर्व खेळाडूंना या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे. स्पोर्टस कॉम्प्लेक्सची होणारी ही इमारत नवोदित खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारी ठरेल, असे अामदार पाटील यांनी म्हटले अाहे.

  शिरोळ येथे मंजूर झालेल्या क्रीडा संकुलाची जागा संपादीत केली असून येथील क्रीडासंकुल उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेऊन लवकरच शिरोळ येथे देखील सर्व सुविधांनी युक्त अद्ययावत अशा क्रीडासंकुल उभारणीच्या कामाला सुरुवात होईल.

  -राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार