उरणमध्ये गाईच्या पोटातून काढले 20 किलो प्लास्टिक आणि नट बोल्ट; ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक

उरणच्या कारंजा गावात गायीच्या पोटातून 1-2 किलो नाही तर तब्बल 20 किलो प्लास्टिक आणि नट बोल्ट बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे(20 kg plastic and nut bolts extracted from cow's stomach in Uran).

    उरणच्या कारंजा गावात गायीच्या पोटातून 1-2 किलो नाही तर तब्बल 20 किलो प्लास्टिक आणि नट बोल्ट बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे(20 kg plastic and nut bolts extracted from cow’s stomach in Uran).

    गाईचे पोट वाढल्याने दिवसेंदिवस त्रास होत होता. उपचार करूनही ती सतत वेदनेने ओरडत होती. ही वाढती वेदना पाहून पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने मेटल डिटेक्टरद्वारे गाईच्या पोटाची तपासणी केली, त्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली.

    डॉ.सोमनाथ भोजने, डॉ.महेश शिंदे,डॉ.महेश सावंत व डॉ.अनिल धांडे यांच्या पथकाने ऑपरेशनद्वारे गायीच्या पोटातून सुमारे 20 किलो प्लास्टिक व धातूच्या वस्तू बाहेर काढून गायीचे प्राण वाचवले. त्यामध्ये पिशव्याचे तुकडे, नट बोल्ट ब्लेड समाविष्ट होते. या संपूर्ण यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.